समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या कारेगाव येथे आज बुधवारी रीड इंडिया व एव्हरी डेनिसन यांच्या संयुक्त उपक्रमातुन परिसरातील सहभागी सुमारे २०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थीना त्यांना विविध क्षेत्रात फायदेशीर फायदेशीर ठरणारे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केलेल्याना आज येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रमाणपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षण सेंटरच्या संचालिका सुवर्णा रोहित नवले यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
मशीन क्लास, ब्युटी पार्लर क्लास,आरी वर्क क्लास,आणि संगणक क्लास यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट चे वाटप करण्यात आले. सुवर्णा नवले यांनी प्रशिक्षण सेंटर बद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, लॉयर असोसिएशनच्या शिरूर तालुका अध्यक्ष ऍड.सीमाताई काशीकर,ऍड.प्रतीक काशिकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मीनाताई गवारे,कारेगावच्या विद्यमान सरपंच वृषालीताई गवारे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई टेंभेकर,सोनाली दौंडकर,संतोष सांबरे, डॉक्टर निकिता तळेकर,हीलिंग लाईफ महाराष्ट्र राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष , इडो स्पार्क संस्थेचे प्लेसमेंट ऑफिसर माने,युरो किड्स च्या प्रिन्सिपल स्नेहा नवले, ओंकार बाबा पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन रोहित नवले संचालक सचिन सोल, डॉक्टर बच्छाव व एवरी डेनिसन चे शैलेश,अभिजीत,महेंद्र, व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये साठ पेक्षा जास्त सहभागी विद्यार्थी कामाला देखील लागलेली आहेत.यावेळी मान्यवरांनी रीड इंडिया एव्हरी डेनिसांचे खूप खूप भरभरून कौतुक केले व एवढा छान उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन केले.आगामी काळात ही अशाच प्रकारचे उपक्रम आपल्या मार्फत सुरु ठेवून सहकार्य करावे अशी विनंती कारेगावच्या सरपंच वृषालीताई गवारे तसेच उपस्थित ग्रामस्थांनी केली. या कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त विद्यार्थी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. हे मोफत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे,पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.