संजयकुमार जोरी यांना जिल्हा उपक्रमशिल गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कार जाहीर

71
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जय मल्हार हायस्कुल विद्यालयाचे माजी उपशिक्षक तसेच शिष्यवृती परिक्षा तज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक,महर्षी शिंदे हायस्कुल आंबळे ता. शिरूर, जि. पुणे प्रशालेचे विद्यमान ‘मुख्याध्यापक’ संजयकुमार विठोबा जोरी यांना संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे यांचे तर्फे दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
                                     
        शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श मुख्याध्यापक संजय जोरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीणच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांचे ३ रे वार्षिक अधिवेशन व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक ०१ अवसरी (खुर्द), ता. आंबेगाव, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.नामदार दिलीप वळसे पाटील सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
जांबुत गावामध्ये ३१ वर्ष शिक्षक म्हणून जोरी यांनी काम केले.मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या भवितव्यात शिक्षक आणि शिक्षिकांचा मोठा अन् बहुमोल वाटा असतो, शिक्षक मुलांना घडवताना त्याची ज्ञानलालसा पूरी करतात. शिक्षक मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर घरी, समाजात कसं रहायचं कसं वागायचं काय करायचं, काय करू नये ह्याचा जीवन पाठ देतात. मुलांमधील सुप्त कलागुणांना बाहेर काढतात. त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात. भावी जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देतात. त्या चिमुकल्या पंखात गरुड भरारी घेण्याचं सामर्थ्य, शक्ती, बळ व आत्मविश्वास जागवतात.असेच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जोरी यांनी केले आहे.
संजय जोरी सर यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जांबुत ग्रामस्थ व आंबळे ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सर्वत्र कौतुक केले जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *