शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील 47 वर्षांपूर्वी दीक्षा घेऊन पूर्ण भारतभर भ्रमंती करत जैन बांधवांना प्रबोधन करणारे जैन संत धर्मगुरू आचार्य विजय विश्व कल्याण सुरेश्वरजी महाराज साहेब यांचे शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील जैन तीर्थक्षेत्र मूळ नायक भगवान नमिनाथ देवालयात दिनांक 23 सप्टेंबर रोजी आगमन झाले असून चातुर्मासानिमित्त आगामी एक महिना येथील जैन
आराधना भवन येथे विश्व कल्याणजी महाराज साहेब वास्तव्यास असणार आहेत.
परमपूज्य विश्व कल्याण जी महाराज साहेब यांचा तीन सुत्री मुख्य कार्यक्रम असून जिनालय (मंदिर), विद्यालय (शाळा), चिकित्सालय (रुग्णालय) विविध ठिकाणी उभारण्यात महाराज साहेबांचे खूप मोठे योगदान आहे तर पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांची प्रबोधन पर व्याख्याने होत असून नवीन पिढीस आवश्यक अशी विविध विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे,पाबळ,लोणी,कवठे यमाई सह जिल्ह्यात 95 जैन मंदिर निर्माण करण्यात विश्व कल्याण जी महाराज साहेब यांचे फार मोठे कार्य ,योगदान आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेडोपाडी पदभ्रमंती करीत तेथील जैन बांधवांना प्रबोधन करण्याचे काम विश्व कल्याणजी महाराज साहेब निरंतर करत आहेत. तर महाराजांवर श्रद्धा असणारे अ जैन बांधव देखील त्यांच्या कार्यक्रमांना व्याख्यानांना आवर्जून उपस्थित राहत असल्याचे पाहावयास मिळते. विशेषतः परमपूज्य आचार्य विजय विश्व कल्याण सुरेश्वरजी महाराज साहेबांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील पाबळ येथील गोशाळा,जैन इंग्लिश मीडियम स्कूल, नेत्रचिकित्सा, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत जवळपास 7000 च्या पुढे नेत्र रुग्णांना दिव्य दृष्टी देण्याचे काम विश्व कल्याण जी महाराज साहेबांनी केले आहे. कवठे यमाई येथे विश्व कल्याणजी महाराज साहेब आल्यानंतर गाव व परिसरात तसेच जैन बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत असून त्यांच्या आगमना च्या दिवसापासून येथील आराधना भवन येथे महाराज साहेबांचे नित्य मार्गदर्शनपर व्याख्यान सुरू असून जैन बांधवांसह अ जैन बांधवही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत आहेत. गावातील सुमारे 27 भाविकांनी एकासन उपवास सुरू ठेवले असून दिवसातून एकदाच अन्नग्रहण हे सर्वजण करीत आहेत. तर शिरूरच्या बेट भागातील जांबुत येथील पंकज भाई रंगलालजी दख हे जैन बांधव मागील 51 दिवसांपासून कडक उपवास (फक्त पाणी घेणे) करीत असून उद्या दिनांक 29 ला कवठे यमाई येथील तीर्थक्षेत्र भगवान नमिनाथ देवस्थान ट्रस्ट आयोजित व परमपूज्य विश्वकल्याण ण विजय जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने येथील श्री बालाजी मंगल कार्यालय येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात दख यांच्या 51 दिवसांच्या निरंकार उपासाची सांगता होणार असून हा कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे यात महाराष्ट्र राज्य परराज्यातील जैन बांधव यांची भाविकांची उपस्थिती राहणार असून ग्रामस्थ ही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.