प्रणाली तुकाराम घोडे हिची पोलीस दलात निवड – शेतकरी कन्येने घेतली भरारी 

209

शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे यमाई च्या गणेशनगरच्या घोडेवस्ती  परिसरात वास्तव्यास असणारे अशिक्षित असलेले शेतकरी पती-पत्नी तुकाराम महादू घोडे व पत्नी मंदाबाई यांची कन्या प्रणाली हिने जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर पोलीस भरती परीक्षा दिली व तिची महाराष्ट्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली असल्याची माहिती प्रणालीचे मामा पांडुरंग मारुती पवार व खंडू मारुती पवार यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.अगदी लहान पणापासून शासकीय नोकरी करण्याचे खास करून पोलीस दलात दाखल होण्याचे  स्वप्न  प्रणालीने उराशी बाळगले असताना अनेक अडचणींवर यशस्वी मात करून तिने ते स्वप्न सत्यात उतरवले आहे.नुकत्याच  झालेल्या ठाणे शहर पोलीस निवड चाचणीत  प्रणाली ने घवघवीत यश  मिळवत पोलीस पदाला गवसणी घातली आहे.
कवठे येमाई येथील  शेतकरी कुटूंबातील प्रणाली घोडे हिचे चौथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.तर माध्यमिक व १२ वी पर्यंत चे शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये मध्ये पुर्ण केले.आई वडील अशिक्षित असताना प्रणालीची शिकण्याची जिद्द पाहून त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी तीला प्रोत्साहन दिले. बी ए च्या शेवटच्या वर्षाचे तीचे शिक्षण सुरु असतानाच तिची पोलीस पदी निवड झाल्याने घोडे- पवार कुटुंबाला खूपच आनंद झाला.  प्रणालीच्या जिद्दीचे समाजाने,गावाने तोंड भरून कौतुक केले.मिळालेल्या यशाने प्रणालीचा ही आनंद गगनात मावेनासा झाला.  तर उत्तरोत्तर अशीच यशाची शिखरे सर करणार असल्याचे  प्रणालीने सांगितले.गरीब शेतकरी घोडे कुटूंबातील तीचे चुलते,चुलती,आजी आजोबा व घरातील सर्वांचेच खूप पाठबळ मिळाल्याचे प्रणालीने सा.समाजशील शी बोलतानाआवर्जून सांगितले. अशा या जिद्दी  प्रणालीची यशोगाथा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.माजी आमदार पोपटराव गावडे,राष्ट्रीय मानवअधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत चे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे,शिरूर पंचायत समितीचे डॉ.सुभाष पोकळे,टाकळी  हाजीचे सरपंच दामुअण्णा घोडे,अरुणाताई घोडे,कवठे येमाईच्या सरपंच वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे,सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,टाकळी हाजीचे सावकार घोडे,बंडूशेठ,रामदास  कांदळकर व मान्यवर ग्रामस्थ रोहिले,पवारवस्ती कवठे येमाई यांनी प्रणालीचे अभिनंदन करीत तीला शुभेच्छा दिल्या आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *