आपल्या मतदार संघात वळसे पाटील साहेबांनी प्री कूलिंग सेंटर्स, वातानुकूलित शीतगृहे निर्मिती केली.जेणेकरून हरितगृहांतून परदेशात फुलांची निर्यात होऊ लागली.नामदार दिलीप वळसे पाटील यांनी शेतीपूरक उद्योगांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले असून, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन,आदिवासी भागातील जमिनींच्या सुधारणेसाठी पडकई योजना,निवासी आश्रमशाळा, प्रशासकीय इमारती, भीमाशंकर वरांजणगाव गणपती तीर्थक्षेत्र विकास, नळ पाणीपुरवठा योजना,डोंगरकडा कोसळल्याने संकटात अडकलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन अशा अनेक कामांसाठी वळसे पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. शिरूर तालुक्यातील रांजणगाव, बाभुळसर, कारेगाव आणि कर्डे गावांतील अडीच ते तीन हजार हेक्टर जमिनीवरील एमआयडीसीचे शिक्के कमी करण्यात आले आहेत.
येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा कुकडी प्रकल्पात समावेश होतो. या प्रकल्पाला १९६६ च्या अखेरीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यांतील साडेतेरा अब्ज घनफूट (थाउजंड मिलियन क्युबिक फूट : टीएमसी) पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या डिंभे धरणाचे भूमिपूजन १९७८ मध्ये झाले होते; पण पुनर्वसनाचा प्रश्न आणि निधीची कमतरता यांमुळे
त्याचे काम रेंगाळले होते.ना.दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदा निवडून आल्यावर या कामाचा सतत पाठपुरावा केला. त्यावर २६५ कोटी रुपये खर्च करून २००० साली धरण पूर्ण केले. या धरणामुळेआंबेगाव तालुक्यात १३ हजार ३२१ हेक्टर आणि शिरूर तालुक्यात १० हजार ६ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाली. कुकडी प्रकल्पाला आता तीन हजार ९७७ कोटी ८५ लाख रुपये खर्चाची सुधारित मान्यता मिळाली असून सातगाव पठाराला पाणी देण्यासाठी आरळा नदीवर कलमोडी धरण बांधण्यात आले आहे.नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. उन्हाळ्यात डिंभे धरणातील पाणी संपल्यानंतर आदिवासी भागांतील शेतकऱ्यांना पिण्यासाठी व उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळावे यासाठी आठ बुडित बंधारे उभारले आहेत. आंबेगाव तालुक्यातील असाणे गावाबरोबरच माळीण, आमडे, अडिवरे यांचा व परिसरातील वाड्यावस्त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पायर डोह लघुपाटबंधारे प्रकल्प उभा करण्यात आला आहे. निघोटवाडी
(पांडवदरा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम मंजूर झाले असून, त्यासाठी याकामी साडे पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी काही वन जमिनीच्या अधिग्रहणाची गरज आहे.
महसूल पातळीवर त्याचा पाठपुरावा सुरु आहे. याखेरीज भीमाशंकर, मंचर, रांजणगाव येथे नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.अशा प्राकारे विविध विकासात्मक लोकहिताच्या योजना ना. वळसे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येत आहेत. आगामी काळात ही शिरूर ,आंबेगाव मधील सुज्ञ जनता मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीशीच भक्कम उभी राहील असा ठाम विश्वास वाटत असल्याचे प्रवीणकुमार बाफना यांनी सांगितले.