दिव्यांग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

510

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : राज्यांमध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे दिव्यांग बांधवांचा , आशा वर्कर,अंगणवाडी सेविका मदतनीस, बालवाडी शिक्षिका या सर्वांचा दसरा, दिवाळी सन मोठ्या  आनंदात उत्साहात साजरा करता येईल म्हणूनच ग्रामपंचायत शिक्रापूर यांनी आचार संहिता सुरू होण्याच्या आधी दिव्यांग बांधव यांना निधीचे वाटप करून सर्वाना भेटवस्तू देऊन यथोचित मानसन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाची कोणताही योजना असू किंवा कोणताही सर्वे असू शिक्रापूर गावातील सर्व अंगणवाडी सेविका त्यांचे काम चोख बजावतात तसेच मुलांना शिक्षण व आहार देण्याचा समतोल राखतात व योग्य रीतीने मुले घडवतात. त्यामुळे शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे दिवाळी निमित्त साड्या देऊन सन्मान करण्यात आला. शिक्रापूर मधील सर्व बालवाडी शिक्षिका, मदतनीस ह्यांचाही दिवाळी निमित्त साड्या देऊन सन्मान करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असून, त्यांना संधी दिल्यास, ते त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून समाजात मोलाचे योगदान देऊ शकतात तसेच त्यांच्यासाठी सहानुभूती आणि समर्पणाने काम करत, आपण त्यांना सक्षम बनवू शकतो. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मान आणि मदतीची गरज असते, जेणेकरून तेही आपल्यासारखं स्वतंत्रपणे जगू शकतील आणि म्हणुनच शिक्रापूर ग्रामपंचायत च्या वतीने शिक्रापूर गावातील सर्व दिव्यांग व्यक्तिंना त्यांचे हक्काचे दिव्यांग निधी वाटण्यात आला असल्याचे शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्रापूर गावाचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, मा.उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे, पूजा भुजबळ, वंदना भुजबळ,  शालन राऊत व ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे भाऊसाहेब उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds