आदिवासीं तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी मुरबाड बस आगारातील चालकावर गुन्हा दाखल

239
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड आगारातील राज्य परिवहन महामंडळाची मुरबाड- किसळ ही ग्रामीण भागातील वस्तीची बस नियोजित स्थळी न ठेवता मुरबाड आगारातील बस चालक नितीन सूर्यराव हे नेहमी ड्युटीवर असताना आपली बस वस्तीच्या नियोजित स्थळी न ठेवता नियोजित स्थळा पासून स्वतःच्या घरी नेहमी नेत असल्याने सायले गावातील तरुण प्रवीण गणेश ठाकरे (22) यांनी चालक नितीन सूर्यराव यांना यांबाबत विचारणा केल्याने या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्रस्त झालेल्या प्रविण ठाकरे या तरुणाने ऐन दिवाळी सणात आत्महत्या केली. यामुळे या तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे कारण पुढे आल्याने चालक नितीन सूर्यराव याच्यावर टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुरबाड- किसळ ही बस नियोजित स्थळी वस्तीला न रहाता स्वतःच्या घरी का नेतो हे न विचारणाऱ्या मुरबाड आगार प्रमुखावर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी केली आहे. या आत्महत्ये मुळे या आदिवासीं कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड आगाराची बस ही रात्री किसळ येथे वस्तीला असताना त्या बसचे चालक हे नजिकच्या सायले गाव चे रहिवाशी असल्याने चालक नितीन सूर्यराव हे बस किसळ ऐवजी नियोजित स्थळा ऐवजीं आपल्या सायले गावी दोन ते तीन किलो मिटर अंतरावर नेहमी घेउन जात असत हा प्रकार  अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र दिवाळी काळात सदर बस चालकाने आपल्या सायले येथे बस लावली असताना मृत तरुण प्रवीण ठाकरे आपल्या मोटर सायकल वरुन नजीकच्या उमरोली या गावात जात असताना रात्रीच्या वेळी रोडवर गप्पा मारत असलेल्या चालक नितीन सुर्यराव व त्यांच्या समवेत असलेले बस वाहक गंभीराव यांनी प्रविण ठाकरे यांच्यात वाद झाला. यावेळी चालक नितीन सुर्यराव याने प्रविण यास जबर मारहाण केली.आपल्याला झालेल्या नाहक मारहाणीमुळे प्रविण याला मनस्ताप सहन न झाल्याने त्याने पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळें या तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे कारण देत पोलिसांनी चालक नितीन सूर्यराव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चालकाने जर बस आपल्या घरी मुक्कामी आणली नसती तर या दोघांमध्ये वाद झाला. नसता व या आदिवासी तरुणाचा बळी गेला नसता अशी चर्चा सर्वत्र सूरु आहे. मयत प्रविणचे डिसेंबरमध्ये लग्न होणार होते. टोकावडे पोलिसांनी चालक नितीन सुर्यराव याला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याच्यासोबत असलेले बस वाहक यांच्या सहआगार व्यवस्थापक यांना सह आरोपी करून महामंडळाची ही बस चालक कोणाच्या आदेशाने घरी नेत होते याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी आदिवासी संघटनेचे नेते दिनेश जाधव यांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds