शिरूर पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई व पंचक्रोशीत शिरूर आंबेगाव चे भाग्यविधाते ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टी व कुशल नेतृत्वातून भरगोस विकासकामे झाली असून रस्ते,पिण्याचे पाणी,विविध इमारती,शैक्षणिक बाबततीत त्यांचे असलेले सुविचार व सर्व सामान्य नागरिकांमधे ना.वळसे पाटील यांची असलेली लोकप्रियता यामुळे कान्हूर मेसाई ग्रामस्थ ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असून गावातील मतभेद दूर ठेवत महायुतीचे कार्यकर्ते एकवटले असून ना. वळसे साहेबाना अधिकाधिक मतदान होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन दादासाहेब खर्डे,माजी सरपंच,कान्हूर मेसाई यांनी केले. ते ना. वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसत होती.
यावेळी बोलताना दादासाहेब खर्डे म्हणाले कि, या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस हा जबाबदारीपूर्वक आलेला आहे आणि म्हणून या उद्याच्या काळामध्ये जे जे मंडळी या ठिकाणी आपल्या गावामध्ये साहेबांच्या बाबतीत बोलत आहेत किंवा विकास कामाच्या बाबतीत कुठेतरी वल्गना करत आहेत मला असं वाटतं की एकदा समोरासमोर चर्चेला या तुम्ही काय तुम्हाला कमी पडलं ? ना.वळसे साहेबांकडून किंवा साहेबांनी तुम्हाला काय दिलं नाही ? तुम्ही फेसबुक व्हाट्सअप वर काहीतरी चुकीचं बोलण्यापेक्षा समोर चर्चा केली तर मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळून जातील. आणि म्हणून ज्याने कोणी काय दिले असेल कमीत कमी त्यांच्या बाबतीत चांगलं बोला. नाही काम करता आलं तर वाईट तरी बोलू नका अशा पद्धतीची मी त्यांनाही सूचना करेल. आणि उद्याच्या काळामध्ये या भागातील पाणी प्रश्न असेल या भागातील विकास काम असतील या भागातील सर्वसामान्य जनतेचे काम असतील ती सर्व सोडविणारी एकमेव करणारी व्यक्ती म्हणजे आपले आदरणीय ना.वळसे पाटील साहेबच असतील आणि म्हणून उद्याच्या २० तारखेला आपण सर्वांनी घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबावं आणि ना.वळसे साहेबांना भरगोस मतदान करण्याचे आवाहन करतो. या भागातील मी कान्हूर मेसाईकरांना विशेष करून विनंती करेल की या ठिकाणी महायुतीतील उपस्थित असलेल्या अनेकांना आपण अनेक वेळा आम्हाला वेगळ्या स्टेजवर बघितल असेल ही पहिलेच निवडणूक असेल की आम्ही दोघ खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साहेबांसाठी एकत्र आलो आहोत आणि म्हणून गाव कुठल्या बाजूला आहे किंवा गावचा विकास काय चाललाय किंवा गावातील कोण कुठलं बाजूला गेले म्हणून आम्ही दुसऱ्या बाजूला जात आहोत अशी कृपया कोणीही गैरसमज करू नका या ठिकाणी ही निवडणूक राज्याची आहे.ही निवडणूक आपल्या एका मताने विधान सभेवर जाणार असलेल्या आपल्या नेतृत्वाची आहे. ह्या निवडणूकीत कुठल्याही ग्रामपंचायत सोसायटीचा राग काढण्याच बिलकुल विषय नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये जरी कोणाला काय शंका गैरसमज असतील ते ही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा सुटू शकतात परंतु आज ही जी वेळ आहे ती वेळ परत येणार नाही म्हणून मी तमाम कान्हुरकर आणि पंचक्रोशी, सर्व आपल्या वाड्यावरचे असतील, खैरेनगर, खैरेवाडी असेल चिंचोली असेल, आपल्या शेजारील हिवरे असेल,पाबळ असेल, धामारी असेल या सर्व गावाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी रांजणगाव पासून सगळे मंडळी या ठिकाणी आले आहेत. जास्त प्रास्ताविक मी करणार नाही परंतु एकच सांगेन की या सरकारमधील ज्या ज्या पाच वर्षांच्या काळामधील योजना आपण उपभोगत आहोत किंवा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे शेतकऱ्यांसाठी जे आपण वीज बिल माफ केले आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रत्येक घरामध्ये दहा-दहा विशेष पन्नास पन्नास हजार रुपये वीज बिल माफी ने लाभ झाला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये किमान वर्षाला ५० हजार रक्कम आलेली आहे. प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून विचारा की काय कोणते योजना असू द्या मग मुख्यमंत्री सहायता योजना सुद्धा कामगार योजना असू द्या आवास योजना, ग्रामसडक योजना आपल्या घरकुल योजना असू द्या या योजनेची एक तरी योजना किंवा आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान आले असतील. एक गोष्ट सांगतो की दोन वर्षांपूर्वी आमच्या गावामध्ये पाण्याचा पूर आला रात्रीचा आमचा एक तलाव फुटला अगदी पहाटेच्या बारा एक वाजता सुमारास गावातील आमचे खालची वस्ती जवळील काही घरे वाहून गेले. लोक अस्ताव्यस्त झाले त्या लोकांना मदत करण्याकामी ना.वळसे पाटील यांचे मोठे सहकार्य त्यावेळी लाभले. साहेबांच्या कामाचा विकासाचा आलेख सांगताना आमच्या कान्हूर मेसाई गावासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये 132 कोटी रुपयांची कामे ना.दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी या भागामध्ये दिलेली आहेत. आजूबाजूला आमच्या गावातील सर्व तरुण बसलेले आहेत सर्वांना साहेब आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की या भागाला आपण फक्त पाणी द्यावं फक्त पाणी दिल्यानंतर आम्हाला दुसरं काहीच नको ही तुम्हाला माफक अपेक्षा व्यक्त करतो.