समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना मुरबाड तालुक्यातील मढ चे भाजपचे सरपंच व कळंबाड (भो) येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या सर्व कार्यकर्त्यांना सुभाष पवार यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सुरोशे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात स्वागत केले.
मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी धसई विभागाचा आज दौरा केला. या दौऱ्यात ठिकठिकाणच्या गावांमध्ये पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुरबाड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवले असल्याचं सुभाष पवार यांनी सांगितले.
भाजप चे कार्यकर्ते व मढ ग्रामपंचायत सरपंच मीना वाघ, सुभाष बोंबे, रमेश बोंबे, राजाराम सुरोशे, बाळाराम भोईर, प्रकाश बोंबे, युवराज बोंबे, देविदास बोंबे, अमोल बोंबे, केशव रण, प्रकाश सावज, उत्तम वाघ, लक्ष्मण वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. तर कळंबाड (भों) येथील राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष कांचन प्रभाकर भोंडीवले, रितेश भोंडीवले, राजेश भोंडीवले, स्वप्निल भोंडीवले,केतन भोंडीवले यांनी ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश करत सुभाष पवार यांना पाठींबा दिला आहे.

मढ, कळंबाड गावातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश
BySamajsheel NewsNovember 2, 20240
Previous Postगतिमान विकासकामांमुळे कान्हूर मेसाई ग्रामस्थ ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार - दादासाहेब खर्डे,माजी सरपंच,कान्हूर मेसाई
Next Postमुरबाड विधानसभेची रंगत वाढत असून कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
