मुरबाड विधानसभेची रंगत वाढत असून कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

222
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेत चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असुन, यामध्ये बाजी कोण मारणार? या बाबत रंगतदार चर्चा मतदार संघात सुरू आहे.४ नोव्हेंबर च्या उमेदवारी माघारी नंतर प्रचाराला रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार आमदार किसन कथोरे यांनी प्रचाराची सुरुवात केली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी व त्यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार यांनीही आपल्या जुन्या सहकार्याच्या मदतीने मतदारांना गवस घालण्यास सुरूवात केली आहे..

    लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पवार तसेच मनसे च्या संगिता चेंदवणकर आणि भाजपचे किसन कथोरे हे  महायुतीच्या प्रचारात आघाडी वर होतें तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी नाकारलेले अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी महाविकास आघाडीचा दमदार प्रचार केला होता.  पण आता समीकरण बदलले आहे.लोकसभा निवडणूकीत महायुतीत सक्रीय असलेले शिवसेना शिंदे गटाला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा  माणूस म्हणून सुभाष पवार यांनी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर विकासाच्या मुद्द्यांवर मनसे चे सर्व सर्वा राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुती व महाविकास आघाडी च्या विरोधात रणशिंग फुंकले असून, मुरबाड विधानसभेत संगीता चेंदवणकर यांना उमेदवारी दिली. तर भाजपचे किसन कथोरे यांना महायुती ने उमेदवारी दिल्याने लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत असलेले हे तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. तर अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी असताना आज महाविकास आघाडी व महायुती तसेच मनसेच्या विरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.


आता या उमेदवारांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली असुन, शैलेश वडनेरे यांनी महाविकास आघाडीने तिकिट नाकारल्या वर अपक्ष लढतांना कुठल्याच पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान नसुन उमेदवारी विकत घेणारे आणि आयात लोकांना महत्व दिले जाते अशा शब्दात टीका करत विद्यमान आमदार किसन किसन कथोरे यांनी विकासाच्या नावाने मुरबाड भकास केल्याचा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांना हाक दिली आहे. तर किसन कथोरे यांनी समोरचा उमेदवार ठेकेदार असल्याचा आरोप करत मागील 15 वर्ष आमदार की काळात गोटीराम पवार यांनी दिवंगत माजी महसूल मंत्री शांताराम घोलप यांच्या स्वप्नांना उध्वस्त करत मुरबाड विकासापासुन कोसो दूर नेले. मात्र महायुती च्या काळात मुरबाड चा विकास झाला असे सांगत मतदार विकासाला मत देतील अशी आशा व्यक्त करताना दिसतं आहे. तर सुभाष पवार यांनी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना प्रतिउत्तर देताना तुमचा सामना जरी ठेकेदाराशी असला तरी आपण पण जंगल ठेकेदार होतें. मुरबाड चा विकास झाला तर मग निवडणूकी पुर्वी नारळ का फोडता? असा सवाल केला आहे. तर विकासाला साथ देणाऱ्या मनसे ची भूमीका अजुन मतदार संघात मांडली नसुन आरोप-प्रत्यारोपापासुन सध्यातरी दूर आहे. यामुळें लोकसभेत महायुती सोबत कार्यरत असणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे मुरबाड मतदार संघाचे लक्ष असुन, या चौरंगी लढतीत कोण किती आघाडी घेते हे लवकरच दिसणार आहे. या चार उमेदवारा सोबत निर्भय महाराष्ट्र पार्टी चे सागर आहिरे, बहुजन मुक्ती पार्टी च्या प्राजक्ता येलवे, अपक्ष उमेदवार शरद पाटिल हे हि नशीब आजमावणार आहे. त्यामुळें माघारीच्या वेळेपर्यंत मुरबाड विधानसभेची रंगत वाढत असून कार्यकर्त्यांच्या भूमिके कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds