शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – भारत सरकारकडे नोंदणीकृत व आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्याअसलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेत राज्याच्या विविध भागात आपल्या कर्तृत्वातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट ठसा उमटवत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे.
मंच च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी जयश्रीताई अहिरे,राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी अमृतताई पठारे,महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष पदी,वैशालीताई बांगर,महाराष्ट्र प्रदेश महिला सह – कार्याध्यक्षपदी वसुधाताई नाईक,तर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून वर्षाताई नाईक यांचे निवड झाली आहे.ही निवड संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस व मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांच्या विचारविनिमयातून करण्यात आली आहे.
मंच मध्ये विविध पदांवर नियुक्त झालेल्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार व राष्ट्रीय किसान विकास मंच च्या सर्वच पधाधिकाऱ्यानी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.