शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

316
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : भारतरत्न, मा.राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २४ रोजी शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर येथे मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपल्या वाचनालयातील वाचक सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे श्री संजय थिटे सर त्याचप्रमाणे अध्यक्ष रमेशराव गडदे सरपंच ग्रामपंचायत शिक्रापूर, सचिव मा.शिवाजी शिंदे सर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत शिक्रापूर, सुदाम खैरे ( ग्रामपंचायत सदस्य),ग्रंथालयाचे व्यवस्थापक मा.ग्रंथपाल संतोष दशरथ काळे पाटील (राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार विजेते), सामाजिक कार्यकर्ते कचरू राऊत, प्रशांत वाबळे ,अविनाश कदम, श्री. कुरे , ग्रामपंचायत वाचनालय कर्मचारी अनंता दरवडे, राहुल राजगुरू, सिकंदर शेख, माणिक चव्हाण,थिटे व मोठ्या संख्येने बालवाचक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संतोष काळे यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती विज्ञानयोगी डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बालवाचक ,तरुण वाचक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचेवेळी इयत्ता सहावीतले विद्यार्थी बालवाचक आदित्य सरवळे व इतर मुलांनी सुंदर भाषणे केली व या वाचनालयातील पुस्तकांमुळे आज आम्ही बोलू शकतो असे अभिमानाने सांगितले. सुरुवातीला संजय थिटे सर यांनी यांनी संबोधन करताना म्हटले की, आजची पिढी वाचनापासून दुरावते आहे. टीव्ही, कॉम्प्युटर मोबाईल यासारख्या माध्यमांमुळे नव्या पिढीचा वाचनाची संबंध कमी होत आहे. पण वाचण्यातला आनंद इतर कशातही नाही. आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करायच असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा आढावाही सरांनी सांगितला. यावेळी अध्यक्ष सरपंच रमेश गडदे यांनी वाचनालयासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रंथपाल संतोष काळे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. यावेळी ग्रंथपाल संतोष काळे, सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम खैरे ,ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जवळजवळ ७० बालवाचकांसह उपस्थित सभासद नागरिक ग्रामस्थ यांना पुस्तके, बिस्किटे व चहापाणी अल्पोपआहार देण्यात आला. उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार ग्रंथपाल श्री संतोष काळे पाटील यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds