शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – वृक्षवल्ली आम्हा सांगे सोयरे,झाडे लावा-झाडे वाचवा,पर्यावरण रक्षण करा या उक्तीप्रमाणे मनात संकल्प केला कि,अशक्य ही शक्य होते. युवा क्रांती फोंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार यांच्या संकल्पनेतून शिरूर तालुक्यातील त्यांच्या वडगाव रासाई या मूळ गावी वृक्ष लागवड योजना प्रभावी पने राबवायची हा संकल्प करीत त्यांनी वडगाव रासाई गावातील छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा वडगाव रासाई या दोन्ही शाळेमधील विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून प्रत्येकी एक झाड देण्यात यावं यासाठी आपल्या वतीने १००० वृक्ष आपल्या वन विभाग मार्फत दिले जावेत असे युवा क्रांती संघटनेचे विनंती पत्र,सोबत शाळांचे झाडांची मागणी पत्र शिरूर वन विभागास दिले.या पत्रास साकारात्मक प्रतिसाद देत शिरूरचे तत्पर वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर प्रताप जगताप यांनी शिवाजीराव शेलार लोकसहभागातून राबवित असलेल्या १००० झाडांच्या वृक्ष लागवड संकल्पनेस तात्काळ मान्यता दिली. वडगाव रासाई येथील जि प प्राथमिक शाळा व शेलारवाडी प्राथमिक शाळा यांना एक हजार वृक्ष लागवडी करीता उपलब्ध करून दिले. वन विभागाच्या माध्यमातून सुरूअसलेली एक पेड मा के नाम ही संकल्पना आपल्या गावात राबविता येत असल्याचा शेलार यांना मनस्वी आनंद झाला.नुकतीच ही झाडे या शाळांतील विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात येत त्यांना एक पेड मा के नाम लावून ते जतन करण्याचे आवाहन शेलार यांनी यावेळी केले. तर जे विद्यार्थी लावलेल्या झाडांचे जीवापाड संगोपन करतील त्यांना युवा क्रांती संघटनेकडून सन्मान म्हणून ट्रॉफी देणार असल्याचे शिवाजीराव शेलार यांनी सांगितले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर , जिल्हा उपाध्यक्ष माऊली आबा थेऊरकर,समीर पवार,तसेच गावातील ग्रामस्थ व शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा युवा क्रांती,पोलीस मित्र,माहिती अधिकार ग्राहक व पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजीराव शेलार तसेच पुणे जिल्हा संघटक भानुदास ढवळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.शेलार यांनी पर्यावरण रक्षणासाठी राबविलेल्या या उत्कृष्ट उपक्रमाचे संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा मंच चे राष्ट्रीय महासचिव तथा संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस व मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयश्रीताई अहिरे,राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष अमृतताई पठारे,,महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष वैशालीताई बांगर,महाराष्ट्र प्रदेश महिला सह – कार्याध्यक्ष वसुधाताई नाईक,तर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष वर्षाताई नाईक,शिरूर तालुका,पुणे जिल्हा युवा क्रांती संघटनेकडून अभिनंदन होत आहे.