ग्रामपंचायत,समस्या आणि उपाय ग्रुपकडून शिक्रापूर बस स्थानकाचा कायापालट- राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून सन्मान  

136
शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – पुणे – शिरूर राज्य महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या शिक्रापूर बसस्थानक परिसराचा ग्रामपंचायत,समस्या आणि उपाय ग्रुपकडून लोक सहभागातून कायापालट करण्यात आला असून परिसरात झालेले घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग ,दारुड्यांचा अड्डा बनत चाललेले शिक्रापूर येथील बस स्थानक, शिक्रापूर ग्रामपंचायत व शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपचे सदस्य यांनी एकत्र येऊन शिक्रापूर बस स्थानकास उर्जित अवस्था देण्याचे काम केले आहे.  अनेक  दानशूर व्यक्तींकडून व लोकसहभागातून केलेला कायापालट पाहून अर्सेनल मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड,सणसवाडी या कंपनीने आपल्या सी एस आर फंडातून एसटी स्टँड साठी छतावरचे पत्रे बदलले एसटी स्टँड मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी तसेच लोकांसाठी पिण्यासाठी आरो फिल्टर पाणी कुलर इत्यादी साहित्य देऊन सहकार्य केले तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक नेहुल साहेब यांच्या हस्ते अर्सेनल मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड सणसवाडी कंपनी ,ग्रामपंचायत शिक्रापूर, शिक्रापूर समस्या उपाय ग्रुप यांना सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी कंपनी प्रशासनाचे एडमिन प्रमुख कदम यांनी सांगितले की, आमची कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करत असते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिक्रापूर एसटी स्टँड येथे शिक्रापूर समस्या उपाय ग्रुप यांचे काम पाहून एस टी स्टँड साठी मदत करण्याचे ठरविले काही काम अजून बाकी असुन त्यामध्ये शिक्रापूर एसटी स्टँड मध्ये टॉयलेट,बाथरूम बांधून देण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. प्रमोद नेहूल यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यामध्ये शिक्रापूर हे एकमेव असे एक एस टी स्टँड आहे की जे लोक सहभागातून कायापालट करण्यात आला आहे आणि शिक्रापूर मधील ग्रुप हा वेगळाच आहे कारण आज पर्यंत आमच्याकडे फक्त सगळे संघटना समस्याच घेऊन येतात पण शिक्रापूर मधील शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप हे समस्या घेऊन त्यावर उपाय ही सुचवत आहेत, तसेच दोन कंट्रोलर आणि नगर पुणे रस्त्याने जाणाऱ्या सर्व एसटी बस शिक्रापूर स्थानकात घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्यावतीने एसटी स्टँड मध्ये विविध केलेल्या कामाची माहिती सरपंच रमेशराव गडदे यांनी दिली. याप्रसंगी मुकुंद जागीरदार एच आर एडमिन हेड, सुरेश कदम एडमिन हेड, दीपक निकुंभ आय आर, भावेश पांडे आय आर, सतीश भुसाळे सी एस आर, सुरेश गडदे एडमिन, एस टी महामंडळ पुणे विभागाचे विभाग नियंत्रक माननीय प्रमोद नेहुल,कामगार अधिकारी भुजबळ, शिरूर आगर प्रमुख मनीषा गायकवाड, सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, उपसरपंच सारिका सासवडे माजी उपसरपंच सुभाषराव खैरे, माजी उपसरपंच मोहिनीताई मांढरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशराव वाबळे,त्रिनयन कळमकर,माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भुजबळ,सा.समाजशीलचे शिक्रापूर प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व शिक्रापूर समस्या उपाय ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds