शिरूर,पुणे : (देंवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिरूर आंबेगावच्या जनतेच्या हितासाठी,विकासासाठी अहोरात्र कार्यरत असणारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष,शिरूर-आंबेगावचे कर्तबगार आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशी आगामी काळात ही भक्कमपणे उभे रहा असे आवाहन भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केले. ते काल दि.२४ रोजी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आयोजित भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ,ग्रामस्थ,शेतकरी समस्या व गावभेट बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी परिसरातील विविध समस्यांबाबत संचालक मंडळाने ग्रामस्थांशी संवाद साधला.
बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. प्रदीपदादा वळसे पाटील,बहुसंख्य संचालक,शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शुभांगी पडवळ, शेतकी अधिकारी डी जे कुरकुटे,सामाजिक कार्यकर्ते सचिन बोऱ्हाडे,सुदाम भाऊ इचके,बाळासाहेब डांगे,रामदास सांडभोर,उत्तम जाधव,भाऊसाहेब घोडे,निलेश पोकळे,बाबूश पाटील कांदळकर,मिठूलाल बाफणा,रामदास माळवदे,अनिकेत रेणके,अशोक गाडेबैल व अनेक ग्रामस्थ व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.सध्या होत असलेल्या पावसाने परिसरातील वाड्या वस्त्यावरील अनेक रस्त्यांची वाताहात लागली आहे. काही ठिकाणी झाडे,झुडपे वाढलेली आहेत. तर काही ठिकाणी चिखलमय रस्त्यातून पायी चालणे देखील दुरापास्त झाले आहे.त्या रस्त्यांची तात्काळ डागडूजी होण्याची गरज अनेक शेतकरी बांधवानी व्यक्त केली.यावर लवकरात लवकर कारखान्याच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी जलद उपाय योजना करण्याचे आश्वासन बेंडे पाटील व उपस्थित संचालकांनी दिले. – एड. प्रदीपदादा वळसे पाटील – उपाध्यक्ष,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना
– शिरूर आंबेगावचा शाश्वत विकास होण्यासाठी जीवाचे रान करणारे नामदार दिलीपराव वळसे पाटील शासन दरबारी या भागातील जनतेच्या हिताच्या व कामाच्या महत्वपूर्ण मागण्या सातत्याने मांडून कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आणण्याचे काम करीत आहेत.तसा हा भाग दुष्काळीच गणला जायचा.वळसे पाटील साहेब आमदार,मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथम या भागातून वाहणा-या घोडनदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून यातून परिसरातील शेतीला बारमाही पाणी कसे मिळेल व शेतकरी दुष्काळी परस्थिततीतून सुजलाम सुफलाम कसा होईल हे महत्वाचे काम केले.शेतीला पाणी मिळू लागल्याने या भागातील शेतकरी हमखास उत्पन्न देणारी ऊस शेती करून चांगले उत्पन्न घेऊ लागला. या भागातील मुलांसाठी विविध उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणल्या.उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा निर्माण केल्या. वीज,पाणी,रस्ते,अंतर्गत रस्ते,कॅनॉल,चाऱ्या,पोटचाऱ्या,महिलांसाठीच्या विविध योजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम वळसे पाटील साहेब प्रभावी पने करीत आहेत.शिरूर आंबेगावाचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आगामी काळात साहेबांच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन प्रदीपदादा यांनी केले.
सुदामभाऊ इचके – माजी पंचायत समिती सदस्य,शिरूर कवठे गावात नामदार वळसे पाटील साहेबांच्याच माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याने या भागातील सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. गावाचे कुलदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुपदरी कामासाठी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण व मजबुतीकरण होणार असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहनांच्या कोंडीतून सुटका होणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. येथील हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी सभागृह,सावली व्यवस्था मिळावी म्हणून नामदार वळसे पाटील साहेबांकडे पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच ही मागणी मान्य होईल असा विश्वास इचके यांनी व्यक्त केला आहे.तर आगामी काळात ही सुज्ञ जनता नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील ही खात्री आहे.