NEWS
Search

नालासोपारात गरजू रूग्ण महिलेला मदतीचा हात –  जिजाऊ संस्थेकडुन विधायक उपक्रम 

47

समाजशील न्यूज  नेटवर्क,नालासोपारा,मुंबई : (सा.समाजशील वृत्तसेवा) – मुंबईच्या नालासोपारा परिसरातील संकटात सापडलेल्या रूग्ण महिलेला जिजाऊ संस्थेकडुन एक हात मदतीचा देऊन आर्थिक पाठबळ देण्याचा विधायक उपक्रम आज राबविण्यात आला.

नालासोपारातील शंकर रायगवळी यांच्या पत्नीलामधुमेहाच्या आजार असून त्यातच त्यांच्या पायाला जखम झाल्याने ती जखम दिवसेंदिवस वाढत होती.  यात त्यांची कौटुंबिक परिस्थितीत अत्यंत हालाखिची असल्याने जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी औषधे व उपचार वस्तु घेण्यास मोठ्याच अडचणी येत होत्या. हीच बाब त्यांनी नालासोपारा परिसरातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांना अडचणीच्या वेळी सदैव मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रूचिता अमित नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सर्व व्यथा व ओढवलेली परिस्थिती सांगितली. जनसेवाचा वसा घेतलेल्या नाईक यांनी तात्काळ या महिलेला मदत मिळवून देण्याकामी  जिजाऊ संस्थेचे जिल्हाप्रमुख पालघर जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे यांना माहिती दिली.संदेश ढोणे यांच्या वतिने व शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख रुचिता नाईक यांच्या माध्यमातून नालासोपारातील रूग्ण महिलेस दोन महिने पुरेल इतके ड्रेसिंगचे साहित्य,योग्य ती औषधे व उपचार वस्तु मोफत तात्काळ उपलब्ध करून दिल्या.
यावेळी शिवसेना ग्रा.त.निवारण कक्ष जिल्हाप्रमुख रूचिता नाईक, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र रांजणे, शिवसेना युवा शहरप्रमुख समीर गोलांबडे शाखा प्रमुख संतोष कांबळे उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds