समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जैन धर्मियांचे आराध्य दैवत भगवान महावीर यांची जयंती आज शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील भगवान नेमिनाथ देवालयात धार्मिक विधी,कार्यक्रमाने संपन्न झाली. यावेळी गावातील कोठारी,बाफना,जैन,शहा,बोरा,गां धी,कोचर कुटुंबियातील बहुसंख्य महिला पुरुष भाविक उपस्थित होते. भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. हा दिवस जैन धर्मात महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो. महावीर जयंती हा जैन समाजासाठी एक महत्त्वाचा उत्सव असून आज १० एप्रिलला देशभर महावीर जयंती उत्साहात साजरी होत आहे. भगवान महावीर हे २४ वे तीर्थंकर आणि जैन धर्माचे शेवटचे उपदेशक होते.अगदी लहान वयात त्यांनी सन्यास घेतला.आज महावीर जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय म्हणजे भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व ५९९ मध्ये बिहार राज्यात झाला. त्यांचा जन्म लिच्छवी वंशातील राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. गरोदरपणात त्रिशाला यांना अनेक स्वप्ने पडली होती. तिच्या पोटी जन्मलेले मुल हे तीर्थंकर होईल, असे त्या स्वप्नात दिसले होते. भगवान महावीरांचा जन्म ब्राह्मण ऋषभदेव यांच्या पत्नी देवानंद यांच्या गर्भात झाला होता, परंतु देवांनी तो त्रिशला च्या गर्भात स्थानांतरित केला अशी आख्यायिका आहे. दरम्यान कवठे येथील जैन मंदिरात भगवान महावीर जयंती संपन्न झाली.