NEWS
Search

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शिक्रापूर परिसरात विविध उपक्रमांनी साजरी

451
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती शिक्रापूर परिसरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, माजी सदस्य सागर सायकर, नवरंग स्टाईल चे नवनाथ गायकवाड, दीपक भुजबळ, सुरेश थोरात, नाट्य परिषदेचे राजाराम गायकवाड व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सेवक उपस्थित होते. संत सावतामाळी ट्रस्ट यांच्यावतीने फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ सचिव पोपटराव गायकवाड व सर्व पदाधिकारी तसेच उद्योजक रवी भुजबळ, निलेश थोरात, भाजपा आघाडीची पंढरीनाथ गायकवाड अन्य उपस्थित होते. तसेच मलठण फाटा शिक्रापूर येथे महात्मा फुले चौकामध्ये फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आजूबाजूचा परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला. यावेळी कानिफनाथ मित्र मंडळ, कानिफनाथ युवा मंच व सायकर मित्रपरिवार कार्यक्रमाला उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds