NEWS
Search

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव ढमढेरे येथे सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

21

समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :   क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे शुक्रवार दि.११ एप्रिलला सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तळेगावातून भव्य मिरवणूक , सायंकाळी ७ वाजता सत्यशोधक चित्रपट निर्माते आण्णा बोराटे यांचा सन्मान,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सायंकाळी साडेसात वाजता शिरूर पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक प्रा.अनिल नरके यांचे महात्मा फुले यांच्या चरित्रावर व्याख्यान , सायंकाळी साडेआठ वाजता स्नेहभोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले विचारमंच कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी सांगितले. तळेगाव ढमढेरे येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालय याठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds