समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई च्या घोडे,भाईक वस्ती नजीकच्या एका शेतकऱ्याच्या शेताच्या बांधा नजीक ५ नारळ,५० साठ लिंबे,त्यावर टाचण्या,दाभण टोचलेल्या,कणकेच्या केलेल्या ५,६ छोट्या बाहुल्या,काही दारूच्या बाटल्या,व तत्सम जादू टोना केलेलं साहित्य आज रविवार दि. १३ ला सकाळी संबंधित शेतकरी संपत मोहन भाईक यांना आढळून आले. ते टोमॅटो पीक घेण्यासाठी तयार केलेल्या आपल्या शेता नजीकच्या बांधावरील वाळलेले गवत व कचरा जाळताना हा अघोरी प्रकार आज सकाळी त्यांच्या निदर्शनास आला. संपत भाईक यांनी तात्काळ जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांचेशी संपर्क साधला.पत्रकार शेटे ही तात्काळ सुमारे २ किमी अंतर असलेल्या त्या शेताच्या ठिकाणी गेले.संबंधित वस्तूंची पाहणी करीत हे सर्व थोतांड व अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला.त्यानंतर या घटनेबाबत अंध श्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव व शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना ही माहिती देण्यात आली.

नंदिनी जाधव यांनी कवठे येमाईचे शेतकरी संपत भाईक यांच्या शी मोबाईल वरून थेट चर्चा करीत हा अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा दिलासा दिला. त्यानंतर पत्रकार प्रा.सुभाष शेटे,शेतकरी संपत भाईक व त्यांचा प्रामाणिक घरगडी लक्ष्मण यांनी हे सर्व साहित्य शेताच्या कडेला नेत वाळलेल्या गवतावर ठेवत पेटवून दिले.हा प्रकार अष्टविनायक महामार्गाच्या नजीकच झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.