पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील विठ्ठलनगर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आषाढ कृ. 14 बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध युवा कीर्तनकार श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री कृष्णानंदजी नागे महाराज (रामायणाचार्य व भगवताचार्य) यांचे कीर्तन होणार असून सर्वांनी हरी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.