समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील कृषि विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका येथे काही वर्षांपासून अतिक्रमण केले गेले होते. सदर अतिक्रमणातील हद्दीतील मोजणी डिसेंबर 2022 मध्ये झाली होती. त्यावेळी अतिक्रमण काढण्यात आले होते,तथापि मधल्या काळामध्ये आजुबाजुच्या जमीन धारकांनी पुन्हा अतिक्रमण केले होते. रोपवाटिकेला संरक्षित भिंत बांधण्यासाठी मंजुरी मिळाली.हद्दीनुसार संरक्षक भिंत बांधण्याची काम फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झाले तथापि पुन्हा अतिक्रमण केलेल्या भागातील क्षेत्रात भिंत बांधताना आजुबाजुचे जमीन धारकांनी अडथळा आणला तसेच कृषी चिकित्सालय हद्दीतील मातृवृक्ष असणाऱ्या जमिनीची जळीत तीन दिवसांपुर्वी आकस्मित आग लागली व भिंत नसल्यामुळे दारु पिणारे व समाजकंटकाचा उपद्रव वाढला होता.तसेच सतत मातृवृक्षाला हानी पोहचवली जात होती. मा.लोकायुक्त,महाराष्ट्र राज्य यांच्या निकाला नुसार व मा.तहसीलदार (खेड) यांच्या आदेशानुसार आज दि 11.03.2025 रोजी अतिक्रमण काढण्याची कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे तसेच तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, तंत्र अधिकारी प्रमोद बनकर,कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ व मंडळ अधिकारी सारीका विटे सह कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, महिला कर्मचारी उपस्थित होते तसेच खेड पोलीस स्टेशन मधील सहा.फौजदार शंकर भवारी,सहा फौजदार साबळे, पोलीस हवालदार संतोष घोलप, महिला पोलीस हवालदार वारे, पोलीस हवालदार चासकर यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई यशस्वी केली .याकामी तीन जेसीबी, एक पोकलेंड, एक ट्रॅक्टर याचा वापर करत अतिक्रमण जमीन दोस्त केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरूनगर यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
