समाजशील न्यूज नेटवर्क,शिक्रापूर,शिरूर : ( प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा शनिवारी ७ डिसेंबरला मोठ्या उत्साहात समारोप झाला.येथील मल्हारगडावर सोमवार दि.२ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत शिवमल्हार ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंदीरातील मुर्तीला फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदीरालाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.ग्रामस्थ भाविकांनी देवदर्शन करत खंडोबा मुर्तीला नैवेद्य अर्पण करून भंडार खोबऱ्याची उधळण करत तळी भरली .
खंडोबा चरित्र पारायण,जागरण गोंधळ, संगीत भजन , हरिपाठ , बेल्हे ता.जुन्नर येथील तानाजी माळवदकर सह रामदास गुंड तुरेवाले यांचा कलगीतु-याचा जंगी सामना, बावडा ता.इंदापूर येथील लक्ष्मण राजगुरू यांचे सोंगी भारूड, महाराष्ट्राची लोकधारा, आळंदी देवाची येथील गोविंद महाराज गायकवाड यांचे सोंगी संगीत भारूड, बुलढाणा येथील समाजप्रबोधनकार ह.भ.प. शिवा महाराज बाविस्कर यांचे कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त कोंढापुरी येथील मल्हारगडावर पार पडले.शनिवार दि.७ डिसेंबरला देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी माजी उपसरपंच अर्जूनराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नगररोडपासून देवाची साखरपुडा मिरवणूक काढण्यात आली होती.साखरपुडा मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मल्हारगडावरील सभामंडपात जागरण गोंधळक-यांच्या साथीत देवाचा साखरपुडा कार्यक्रम पार पडला.यावेळी भंडा-याची उधळण करण्यात आली.

साखरपुडा कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड, पदाधिकारी अर्जूनराव गायकवाड, बापुराव दादासाहेब गायकवाड, माजी संचालक विजयराव ढमढेरे, ऋषीकेश गायकवाड, गणेश संजयराव गायकवाड,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संपतराव गायकवाड, सोसायटीचे माजी पदाधिकारी रामदास सर्जेराव गायकवाड,माजी सैनिक लक्ष्मणराव गायकवाड, माणिकराव सोपानराव गायकवाड, बळवंत गायकवाड, प्रकाशराव दिघे, बाळासाहेब रासकर,रघूनाथ नानासाहेब गायकवाड, माणिकराव रामचंद्र गायकवाड, शिक्रापूर येथील सा. समाजशीलचे जेष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड,खंडाळे येथील ग्रामस्थ संपतराव गणपत दरवडे, निमगाव म्हाळुंगी येथील ग्रामस्थ बाळासाहेब बाठे, तसेच महिला साखरपुडा कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.श्री.क्षेत्र आणे येथील कोंडीबा दाते यांनी बनविलेल्या आमटी, भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांनी घेतला.परगावांहून आलेल्या विविध खेळणी विक्रेत्यांनी आपापली दुकाने मल्हारगडावरील पटांगणावर थाटल्याने मल्हारगडावर जत्रेचे स्वरूप आले होते.
भाऊसाहेब थोरात,पुणेकर,होलगुंडे, माणिक रामचंद्र गायकवाड, सुनिल साहेबराव गायकवाड,माजी उपसरपंच आशिष मुरलीधर गायकवाड, मेडिकल व्यावसायिक धनंजय माणिकराव गायकवाड, कुंडलिक खंडू गायकवाड,दीपक ज्ञानेश्वर गायकवाड,विठ्ठल रामराव गायकवाड,शाहीर वामनराव गायकवाड या अन्नदात्यांनी अन्नदानासाठी सहकार्य केले.दुपारी ३ नंतर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल लेझीम खेळाच्या साथीत वाजत- गाजत पांडूरंग मंदीरापासून देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.पालखी मिरवणूक सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सायंकाळनंतर देवाच्या लग्न सोहळ्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.