समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म./ बी फार्म.) मार्फत एड्स सप्ताह निमित्त विशेष जनजागृती मोहीम नुकतीच राबविण्यात आली असल्याची माहिती डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ अमोल शहा सर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
या निमित्ताने दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. महेश खरात, कम्युनिटी कोऑर्डिनेटर, नारी संस्था भोसरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी एड्स या आजाराविषयी मार्गदर्शन करताना आजार कसा होतो, त्याची लक्षणे, आजार होऊ नये म्हणून काय करावे व आजार झाल्यावर औषधोपचार काय घ्यावे याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
दि. ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व अपोलो टायर्स फाउंडेशन व क्लासिक इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्ट लि. यांच्या वतीने शिरूर शहरामध्ये एड्स या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली व पथनाट्य यांचे आयोजन करण्यात आले. डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून एड्स या आजाराविषयी समज, गैरसमज, औषधोपचार, प्रतिबंध याविषयी माहिती दिली.
यावेळी डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ अमोल शहा सर, बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती सर, अपोलो टायर्स फाउंडेशनच्या वतीने सीएसआर मॅनेजर श्री प्रवीण चंदनकार सर, प्रा. विशाल कारखिले, प्रा. मीनाक्षी वाजे, प्रा. निखिल केदारी, प्रा. मानसी गरदरे, प्रा. नयना पवार, डॉ. मनोज तारे, डॉ. सचिन कोठावदे, प्रा. मोनाली परभने, प्रा. विद्या पाचरणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एड्स सप्ताह मधील कार्यक्रमांचे आयोजन प्रा. विशाल कारखिले व प्रा. मोनाली परभणी यांनी केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स आजाराविषयी केलेल्या जनजागृती अभियानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव श्री धनंजय थिटे संचालक डॉ. हर्षवर्धन थिटे यांनी कौतुक केले.