शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचा विद्यार्थी कु.गजेंद्रसिंग चेत्राम याने 19 वर्ष वयोगटातील 55 किलो या वजन गटात पहिला क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. लांडेवाडी येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत 19 वर्षांच्या वयोगटात ज्ञानगंगा विद्यालयातील खेळाडूंनी सलग दोन वर्षे सुवर्ण पदक जिंकून विभागस्तरावर निवड करत आपली क्षमता सिद्ध केली. या विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, विद्यालयात चालणारा बारा ही महिने कराटे, ज्युदो ,तायक्वांदो, कबड्डी,व्हाॅलीबाॅल प्रशिक्षण उपक्रम आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेने हा मान मिळवला आहे. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, सी.ई.ओ.डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले, उपप्राचार्य जयश्री खणसे, कॉलेजे समन्वयक व्ही.डी.शिंदे आणि सर्व शिक्षकांनी गजेंद्रसिंग चे व क्रीडा शिक्षक सागर कोकाटे यांचे अभिनंदन करुन आंबेगाव येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
Home बातम्या गजेंद्रसिंग चेत्राम – जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक ; विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड
गजेंद्रसिंग चेत्राम – जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक ; विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड
BySamajsheelOctober 26, 20240
100
Previous Postमुरबाड विधानसभेत शैलेश वडनेरे अपक्ष लढणार ? तिरंगी लढतीची शक्यता !
Next Postमाजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या पाठोपाठ शिरूरचे मितेश गादिया यांचा ही पदाला रामराम