कवठे येमाई चे बाळासाहेब डांगे शिवसेनेत : राष्ट्रवादी काँग्रेसला केला जय महाराष्ट्र 

787
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कट्टर समर्थक राहिलेले आणि कवठे टाकळी जिल्हा परिषद गट (आंबेगाव- शिरूर विधानसभा)  संभाव्य उमेदवार असलेले शिरूर तालुक्यातील कवठे येमाई चे बाळासाहेब डांगे यांनी काल दि. १० रोजी मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दादर येथे शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तथा माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेची मशाल हाती घेतली. याप्रसंगी पुणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र समन्वयक सन्मा. रविंद्र मिर्लेकर,माजी महापौर विशाखाताई राऊत हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित शिवसेना नेत्यांनी बाळासाहेब डांगे व सहकारी यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ भोर ,महाराष्ट्र वितरक सेना अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख,जुन्नर/आंबेगाव दिलीप बाम्हणे, उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, तालुका प्रमुख सन्मा. ॲड. भोलेनाथ पडवळ, गणेश जामदार, युवा सेना जिल्हाप्रमुख संदीप शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन वागदरे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर साहेब यांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मिर्लेकर, विशाखा ताई राऊत यांनी.बाळासाहेब डांगे व त्यांचे सहकारी यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds