शिरूरच्या मिडगुलवाडी घाटात बिबट्याचा दुचाकीवर हल्ला : घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी 

2735
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई ते कान्हूर मेसाई दरम्यान असलेल्या मिडगुलवाडी घाटातून दुचाकीवरून घरी चाललेल्या तरुणावर घाटातील चढावर बिबट्याने झेप घेत तरुणावर हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल शनिवार दि. १० रोजी रात्री साडेसहाच्या दरम्यान घडली. दरम्यान पाठीमागून आलेल्या सागर मिडगुले नावाच्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने रस्त्यावर पडलेल्या त्या तरुणाची अवस्था पाहून इतारांच्या मदतीने तात्काळ हालचाल करीत त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवले. दरम्यान आज सकाळी शिरूर वन विभागास या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर त्या गंभीर जखमी तरुणास तात्काळ मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिरूर चे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
       या घटनेबाबत शिरूर वन विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार कृष्णा बबन जाधव हा ३० वर्षीय तरुण काल रात्री कवठे येमाई कडून मिडगुलवाडी घाटमार्गे आपल्या घरी चालला असताना सायंकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान घाटातील चढावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट दुचाकीवर झेप घेत तरुणावर हल्ला केला. त्या तरुणाच्या मानेवर गळ्यावर,हातावर हल्ला केला. त्या तरुणाने बिबट्याचा शर्थीने प्रतिकार करीत त्याचा हल्ला परतवून लावत आपला जीव वाचवला.दरम्यान आज सकाळी शिरूरचे वनपाल नितीन म्हात्रे,वन रक्षक नारायण राठोड,वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी तातडीने त्याला पुढील उपचारासाठी मंचर शासकीय रुग्णालयात हलवले. त्याच्यावर तेथे तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिरूर वन विभागाकडून देण्यात आली.
निळकंठ गव्हाणे – वन परिक्षेत्र अधिकारी शिरूर 
“कवठे येमाई जवळील मिडगुलवाडी घाटात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी तरुणावर मंचर येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार करण्यात आले असून उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या वन विभागामार्फत करण्यात येईल. शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात खास करून बेट भागात बिबट मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शेतवस्तीवर जाणाऱ्या,राहणाऱ्या  नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊन अंधार पडण्या अगोदर घरी जाण्याची दक्षता घ्यावी. शक्यतो रात्री दुचाकीवरील प्रवास टाळावा.ज्या परिसरात ही घटना घडली आहे तेथे आजच तात्काळ पिंजरा लावण्यात येईल”. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds