ऍग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र ; शिक्रापूर येथे मोफत कॅम्प 

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : ग्रामपंचायत कार्यालय शिक्रापूर येथे आज दि.४ रोजी अँग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र (Farmer Id) काढण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय शिक्रापूर येथे मोफत कॅम्प आयोजित केला होता. गावचे सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, सारिका सासवडे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे, ग्राम महसूल अधिकारी सुशीला गायकवाड, कृषि सहाय्यक अशोक जाधव, CSC धारक अमोल पांडे व मोहन भुजबळ, ए एस एन. कम्प्युटर्स, पत्रकार राजाराम गायकवाड, संतोष काळे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी 50 ते 60 लोकांनी फार्मर आयडी तयार करून घेतला व सरपंच रमेश गडदे यांनी शिक्रापूर राऊतवाडी येथील शेतकऱ्यांना आव्हान केले की राहिलेल्या इतर शेतकऱ्यांनी दोन दिवसात आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds