NEWS
Search

विशाल गायकवाड यांची समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड

101

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावचे सुपुत्र तसेच शिक्रापूर या ठिकाणी व्यवसाय निमित्त वास्तव्यास असलेले युवा नेते पै. विशाल गायकवाड यांची सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र सैनिक समाज पार्टीचे प्रदेशअध्यक्ष ॲड. शिवाजी डोमाळे व सैनिक समाज पार्टीचे कार्याध्यक्ष जनसेवक तुकारामजी डफळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले. हे निवडीचे पत्र देत असताना त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय लोक चळवळ, लोकसहभाग व तरुणांसाठी आणि महिलांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत पुढाकार घेऊन न्याय देण्याची भावना,= त्यांनी सतत ठेवली असल्यामुळे व त्यांचे हे हिरारीचे व धाडसाचे काम पाहून सैनिक समाज पार्टीचे नेते शिवाजी डमाळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले व तुकाराम डफळे यांनी त्यांना पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे काम उभे करून पार्टीचे नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेण्यासाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या. तर पै.विशाल गायकवाड यांनी आपले मत व्यक्त करत असताना म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला कुठेही तडा न जाता भविष्य काळामध्ये पक्षाला बळकटी देण्याचे काम मी सातत्याने करत राहील व जन माणसांसाठी मी सदैव कार्य करेल.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds