शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्रापूर शाळा येथे बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा कर्तव्य फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न झाले. शिबिराचे शिबिराचे उद्घाटन माहेर संस्थेच्या युसी कुरियन यांच्या हस्ते झाले. यावेळी बालरंगभूमी पुणे शाखेचे अध्यक्ष दिपाली शेळके, उपाध्यक्ष अरुणजी पटवर्धन, नारायणराव करपे, राजेंद्र बोधे, देवेंद्र भिडे, मुग्धा वडके, मंगेश चव्हाण, मंजुषा जोशी, अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी केली. यावेळी नटराज मूर्तीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. माहेर संस्थेच्या लुसी कुरियन यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि विशेष सहकार्य कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मनीषाताई गडदे, शिक्रापूरचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच रमेश गडदे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी फाउंडेशनच्या सदस्या वंदना रांमगुडे, मेघा तांबे, महेश शिर्के, अंकुश घारे, वैशाली गायकवाड, उदय ब्राह्मणे, राजाराम गायकवाड, मोहम्मदभाई तांबोळी, लाठी-काठी चे तांबे सर, टोके इत्यादी उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना अल्पहार, प्रमाणपत्र देऊन त्यांचा येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंगभूमीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष दिपाली ताई शेळके यांनी केली व कार्यक्रमाचे सांगता अल्पाहार करण्यात आली.