शिरूरच्या रावडेवाडीत फार्मर आयडी ची जनजागृती – कृषी सहायक नंदू जाधव यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

801
  समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे नुकतेच शासनाच्या अँग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र (Farmer Id) काढण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय रावडेवाडी येथे मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरूर तालुका कृषी विभागाचे कवठे – निमगाव दुडे विभागाचे कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक नंदू जाधव यांनी उपस्थित शेतकऱयांना फार्मर आय डी बाबत योग्य ते मार्गदर्शन,सूचना केल्या.यावेळी रावडेवाडी गुरुदत्त विकास सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण हरिभाऊ रावडे,पांडुरंग रावडे, माउली रावडे,व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. अजिंक्य बाळासाहेब रावडे यांनी उपस्थित अनेक शेतकऱयांना फार्मर आय डी काढून देण्यास महत्वपूर्ण सहयोग दिला.   यावेळी उपस्थित अनेक शेतकऱयांनी आपला फार्मर आयडी तयार करून घेतला. रावडेवाडी येथील सर्वच सातबारा धारक शेतकऱयांनी दोन दिवसात आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावे असे आवाहन कृषी सहायक नंदू जाधव यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds