शिरूर तालुक्यातील १००% ग्रामसभांचे ठराव – शिरूर तालुका पुणे जिल्ह्यात च असावा – संजय पाचंगे यांची या प्रश्नी भुमिका आक्रमक 

404
समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र  प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पुणे जिल्हयाचे विभाजन होऊन नवीन बारामती जिल्हा अस्तित्वात येणार व शिरूर तालुक्याचा समावेश बारामती जिल्हयात होणार या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याने व तालुक्यात या संदर्भात ग्रामसभांचे ठराव करण्याचे आवाहन केल्यानंतर शिरूर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी १०० टक्के ग्रामसभांचे ठराव केले असून शिरूर तालुका पुणे जिल्ह्यात च असावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर जिल्हा विभाजनाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहावयास मिळत होते.
        जिल्हा विभाजनाच्या या प्रश्नी भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आक्रमक भुमिका घेऊन शिरुर तालुक्याचा समावेश बारामती करण्यास तिव्र विरोध दर्शविला होता.त्यांनी तालुक्यातील नागरीकांना ग्रामसभांमध्ये याबाबत २६ जानेवारी २०२५ च्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरूर तालुक्यातील १००% ग्रामसभांचे पुणे जिल्हा विभाजन झाल्यास बारामतीत जाण्यास विरोध दर्शविला असुन शिरुर तालुक्याचा समावेश पुणे जिल्हातच असावा असे ठराव ९६ ग्रामसभांमध्ये मंजुर करण्यात आले असल्याची माहिती पाचंगे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
शिरूर चा समावेश बारामतीत होणार या चर्चेने,बातमीने तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भौगोलिक दृष्ट्या शिरुर ते बारामती अंतर हे खुप जास्त असुन पुणे त्यामानाने खूपच जवळ आहे.शिरूर तालुक्यातील नागरीकांना पुण्याची सवय झाली असल्याने नागरिकांचा शिरूरचा बारामतीत समावेश होण्यास विरोध होता.परंतु थेट  उपमुख्यमंत्री अजितदादांना विरोध करायचा कोणी ? हा सर्वांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. संजय पाचंगे हे मात्र व्यापक समाजहिताच्या प्रश्नावर थेट भुमिका घेऊन सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी स्वतःला झोकून देत कार्यरत आहेत  अगदी याही प्रश्नावर त्यांनी थेट भुमिका घेतली व शिरुर चा समावेश बारामतीत करण्यास विरोध दर्शविला आहे. महत्वाचे म्हणजे शिरुर तालुक्यातील नागरिकांनी ही त्यांच्यावर पुर्ण विश्वास दाखवला आहे.
तर ग्रामसभेचे या विषया अनुसरून आलेले ठराव गट विकास अधिकारी,शिरूर  यांनी एकत्रित करून ते आम्हाला उपलब्ध करून दिले असल्याची माहिती पाचंगे यांनी दिली. हे ठराव मंजूर होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले तसेच गट विकास अधिकारी व विविध गावाचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी सुद्धा जनतेसमोर योग्य पद्धतीने हा विषय मांडला त्यांचे आणि तमाम ग्रामसभा /नागरीकांचे पाचंगे यांनी मनापासून आभार मानले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds