ज्ञानगंगा विश्व विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

343

शिरूर, प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर येथील  ज्ञानगंगा विश्व विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व उच्चशिक्षित महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला पालकांसाठी विविध मनोरंजनपर खेळांचे आयोजन करण्यात आले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षा विस्तार अधिकारी वंदना शिंदे  यांनी  सर्वांना उत्तम असे मार्गदर्शन केले.  तसेच डॉक्टर सविता सोनवणे आणि डॉ. स्वाती पानगे यांनी सर्व महिला पालकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कसे आवश्यक आहे, त्याचबरोबर स्त्रियांचा आहार चौरस पूर्ण असणे किती महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले आणि जीवनधारा आयुर्वेदिक फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा घोडे यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सविता घावटे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका अमृतेश्वरी घावटे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन जयश्री खणसे यांनी तर मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांनी आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds