जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून कर्तव्य फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

89
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे…

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य कर्तव्य फाउंडेशन ने आज बजावले असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर एस टी स्टँड येथे सी सी टी व्ही कॅमेरे लोकार्पण सोहळ्यात पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले. या लोकार्पण कार्यक्रमास शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच पूजा भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी मांढरे, उषा राऊत, वंदना भुजबळ, शालन राऊत, उद्याजल गौरव सिंग, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर फक्त चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवत महिला दिनाच्या निमित्त आदर्श सरपंच रमेश गडदे व कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांची, ज्येष्ठ नागरिकांची, सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थिनी यांची सुरक्षितता राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सरपंच रमेश गडदे यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या कामाची माहिती विशद केली आणि गौरी हिंगणे व पूजा भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, कृष्णा सासवडे, शिरूर आगारप्रमुख मनीषा गायकवाड, लाठी काठी प्रशिक्षक तांबे सर, टोके सर, ॲड राजेश धुमाळ भूमता ब्रिगेडच्या अध्यक्ष मंगल सासवडे, वनाधिकारी गौरी हिंगणे, विखारे ताई, कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शिक्रापूर समस्या व उपाय ग्रुपचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी केले तर कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds