समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक)- पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक प्रश्नांची सोडवणूक तीही प्रामाणिकपणे व विनाशर्त करण्याचे ध्येय ठेवल्यास तो पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास अनुसरून कार्य करताना दिसून येतो अशा प्रामाणिक पत्रकारांची नक्कीच दखल घेतली जाते. मागील २० वर्षांपासून पत्रकारितेतून विविध सामाजिक प्रश्न निस्वार्थपणे विविध माध्यमातून मांडून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकामी सतत प्रयत्नशील असणारे वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांना नुकतेच दैनिक संध्या व संध्या न्यूज लाईव्ह चॅनेलच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दै.संध्या चे संचालक मा.आमदार संजय जगताप व संपादिका ज्योती नाळे यांनी पत्रकार शेटे मागील अनेक वर्षांपासून प्रिंट,इलेक्ट्रॉनिक,सोशल मिडीयाच्या माध्यमातून करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना जागतिक महिला दिनी पुण्याच्या दै संध्या कार्यालयात ,युवा क्रांती फाऊन्डेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा वर्षाताई नाईक,कार्यालय लिपिक निकिता रसाळ,सेवानिवृत्त इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर श्रीकांत अष्टेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पत्रकार शेटे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.पत्रकारिते व्यतिरिक्त जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे हे युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र मिडीया प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख म्हणून प्रभावीपणे कार्य करीत आहेत.

जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांना हा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,राज्याचे माजी सहकार मंत्री,या भागाचे लोकप्रिय आमदार दिलीपराव वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,युवानेते राजेश भैय्या सांडभोर,चेअरमन अशोकराव गावडे,पत्रकार मित्र व मित्र परिवारा सह युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा तक्रार समिती अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,व संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.