समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात अत्यंत जेमतेम परिस्थितीतून उच्चशिक्षित झालेले व रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांत उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करीत हजारो विद्यार्थ्याना घडविणारे प्राचार्य किसनराव रत्नपारखी यांच्या कामाची दखल घेत आज ही वयाच्या ६९ व्या वर्षी तरुणांना लाजवेल असे कार्य करणारे रत्नपारखी सर यांची नुकतीच सेवानिवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून रयतच्या शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे.

रयतच्या शिक्षण संस्थेच्या च शाळेत शिक्षण घेत अध्यापक,प्राचार्य,लाईफ वर्कर,लाईफ मेंबर,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,विभागीय अधिकारी पश्चिम विभाग पुणे अशा विविध पदांवर रत्नपारखी सरांनी सेवाभावी व त्यागी वृत्तीने रयत संस्थेसाठी मनापासून कार्य सुरु ठेवले आहे. आशिया खंडातील रयतच्या शिक्षण संस्था सर्वात मोठी शिक्षण संस्था असून या संस्थेत शिक्षण घेत त्याच शिक्षण संस्थेत विविध पदांवर कार्य करण्याचे भाग्य मला लाभल्याचे प्रा.रत्नपारखी सरांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.त्यांचे मूळ गाव व ज्या शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले त्या रयत शिक्षण संस्थेच्या कवठे येमाई विद्यालयाचा कायापालट करण्यात प्रा.रत्नपारखी सर यांनी अद्वितीय योगदान दिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्याचे माजी सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील,आमदार हडपसर चेतन तुपे,माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार राम कांडगे, माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे.युवा क्रांती फौन्डेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा वर्षाताई नाईक,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील रत्नपारखी व कवठे येमाई ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी रत्नपारखी सर यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.