समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मीना नदी – नारायणगाव, भास्कर घाट-जुन्नर सह कुकडी नदी- बोरी,आळेफाटा, घोडेगाव, चास-कडेवाडी आणि चिंचोली (कोकणे) येथील घोडनदीचा घाट / किनारा (तिर) परिसर सह पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी निरंकारी स्वयंसेवकांनी नदीपात्र स्वच्छ केले आहे. जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, २२ फेब्रुवारी २०२६, सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत परम श्रद्धेय निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने एवं निरंकारी राज पिता जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.
या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील घोडनदी सह कुकडी, मिना, इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम विशेष राबविण्यात आली. यात घोडनदी-घोडेगाव & चांडोली – मंचर, मीना नदी – नारायणगाव, भास्कर घाट-जुन्नर सह कुकडी नदी- बोरी,आळेफाटा ब्रांच च्या माध्यमातून सर्वच ठिकाणी जवळच्या नदीच्या पात्रात / घाटांवर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, कार्यकर्ते, जलप्रेमी, निसर्गप्रेमी सह मिशनचे बहुतेक स्वयंसेवक / सेवादार मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील १६०० हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय,भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ ची सुरुवात केली होती.
जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल. जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज देखील घडू शकेल.निरंकारी सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.शेवटी स्वछता अभियान संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी निरंकारी सत्संग समारोहाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामधून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश या आध्यात्मिक विचारधारेतून देण्यात आला.