समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – मागील अनेक वर्षांपासून समाजातील विविध घटकांना विविध प्रकारची मदत,सहकार्य करीत अल्पावधीत आपल्या कार्याची चुणूक दाखवत दखल घ्यावी असे कार्य करीत असलेले शिरूर तालुक्यातील मूळ कवठे येमाईच्या माळीमळा (गांजेवाडी) येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या शिक्रापूर,तळेगाव ढमढेरे परिसरात व्यवसाय निमित्ताने कार्यरत असणारे विशाल हरिभाऊ गायकवाड यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सावता सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे पत्र सावता सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांच्या होते व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुलीचे सतरावे वंशज दादा महाराज वसेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक देण्यात आले.

यावेळी विष्णु देवकर, ठकसेन तुपे, दादा राऊत, जगन्नाथ रोठे,स्वाती ताई गोरे, सारिका ताई भुजबळ, चित्रा ताई परंडवाल, संजिवनी ताई कापरे, स्वाती ताई कातखाडे, सचिन जकाते,माणिक भूमकर, संतोष खेडकर, नितीन परंडवाल, विकास नरके,संतोष भुजबळ,नवनाथ जकाते,सुनील भुजबळ,आबाजी वाव्हाळ,मंदार शेंडे ,संतोष पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडी नंतर विशाल गायकवाड यांनी सांगितले की, संघटना अधिक मजबूत करून तळागाळातील सामान्य जनतेची सेवा व त्यांना योग्य त्याठिकाणी न्याय व मदतीचा हात देण्याचे कार्य आगामी काळात प्रामाणिकपणे केला जाईल असे आश्वासन दिले.विशाल गायकवाड यांच्या निवडीबद्दल समस्त ग्रामस्थ कवठे,गांजेवाडी,माळीमळा ग्रामस्थांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



