डिंभे उजवा, डावा कालवा,घोड शाखा यांना पाण्याचे आवर्तन सुरु : शिरूर- आंबेगावच्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : माजी मंत्री वळसे पाटील यांचा पाठपुरावा 

391
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  फेब्रुवारी महिना अद्याप संपला नसताना थंडी जवळपास गायब झाली असून उन्हाची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अशा परस्थितीत शिरूर,आंबेगाव मधील शेतीला असणारे पाण्याचे श्रोत ही कमी पडताना दिसून येत असून पाण्यावाचून पिकांची वाताहात होण्याची चिन्हे असतानाच  हीच बाब लक्षात घेत या भागाचे विधानसभा प्रतिनिधी तथा राज्याचे माजी सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांनी अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ,पुणे यांना नुकतेच या कालव्यात पाणी सोडण्याबाबतचे पत्र ही दिले होते. तसेच काल दि. २१ ला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दिलीपराव वळसे पाटील यांच्या झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला. वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज रविवार दि. २२ ला सकाळी डिंभे उजवा व डावा कालवा (घोड शाखा) यांना पाण्याचे आवर्तन सुरु झाल्याची माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे,विजय थोरात यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर  डिंभे उजवा, डावा कालवा,घोड शाखा यांना पाण्याचे आवर्तन सुरु झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याचे पाणी,शेतीमाल,जनावरांची चारा पिके,विहिरींना पाणी वाढण्यासाठी मोठाच फायदा होणार आहे.फक्त नियोजन बद्ध पद्धतीने तीन ही कालव्यास सुटलेले पाणी सर्वांना सारखे व मुबलक मिळावे अशी अपेक्षा युवा क्रांती फाउंडेन राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी केली आहे. तर हेड तू टेल सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास आंबेगाव,शिरूर मधील शेतकरी बांधवांमधून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *