शिरूरमध्ये चैतन्य सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांच्या ७९ व्या समाधी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम

12

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर (घोडनदी) येथे चैतन्य सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांच्या ७९ व्या समाधी दिनानिमित्त शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी भक्तिभावाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


या निमित्ताने सायंकाळी ५ वाजता भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रींच्या पोथी वाचनाचा कार्यक्रम होणार असून, रात्री ८ वाजता श्रींची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.हा कार्यक्रम तिळवण तेली समाज मारुती मंदिर, मुंबई बाजार, शिरूर (घोडनदी), जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. आयोजकांनी सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन श्री. चैतन्य  सद्गुरू श्री शंकर महाराज सेवाभावी प्रतिष्ठान, शिरूर तसेच समस्त भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
समाधी दिनानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *