समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज भक्तांचे पहिले अन्नछत्र समिती ट्रस्टच्या वतीने महाष्टमी निमित्त एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी श्रींच्या ७१ व्या समाधी दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष राजाभाऊ रेवडे,डॉ.दिनेश रंगरेज यांनी दिली.

हे शिबिर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत उत्सव मंडप, धनकवडी पुणे येथील श्रींच्या मठाजवळ, ईशान्य सोसायटी समोर येथे पार पडणार आहे. या शिबिरामध्ये सर्व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाचे संयोजन डॉ. दिनेश सूर्यकांत रेंगोज व त्यांच्या डॉक्टर्स टीमकडून करण्यात आले असून, विविध रुग्णालये व संस्थांचे सहकार्य यात लाभले आहे.
समाजहिताच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भक्त व नागरिकांकडून या सेवाभावी कार्याचे कौतुक होत आहे.

