शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दीड वर्षांत २१ कोटींचा एमडी ड्रग्स जप्त

24

        समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षात पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल २१ कोटी रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त केला आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आळा बसला असून परिसरात पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापे टाकून १६ आरोपींवर तडीपारची कारवाई करण्यात आली, तर ७ जणांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी १६ पिस्तुले, २३ जिवंत काडतुसे,एक तलवार व कोयता जप्त करून अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन हे भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण क्षेत्रात कार्यरत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल सतत दक्ष आहे. गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत “गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसविणे” हा उद्देश ठेवून पोलिसांनी प्रभावी कारवाया केल्या आहेत.याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने गांजा विक्री करणाऱ्या टोळ्यांवरही कारवाई करत सुमारे १५३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी शहरातील ४,७५७ संशयित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून शांतता राखण्यास मोठे योगदान दिले आहे.“कायद्याला आव्हान देणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल,” असा इशारा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी देत नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *