गर्भवती महिला,बालकांच्या आरोग्यास प्राधान्य – जि.प. सदस्य राजेंद्र गावडे 

7

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला, बालके आणि गरजू रुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी दिले.कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन आधुनिक सुविधायुक्त इमारतीच्या बांधकामाची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी जन आरोग्य समितीची सभा केंद्रात पार पडली. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य केंद्रातील विविध सुविधांबाबत चर्चा केली.
सभेस जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य कांचन सांडभोरे, पांडुरंग भोर, रामदास सांडभोरे, रितेश शहा, अविनाश पोकळे, गुलाब वागदरे, विठ्ठल मुंजाळ यांच्यासह तंटामुक्ती उपाध्यक्ष बबुशा पाटील कांदळकर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र गावडे यांनी आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तसेच औषधांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. गर्भवती महिला, बालके आणि गरजू रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी,यासाठी आरोग्य केंद्राच्या कामकाजाला प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले.
नवीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *