समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एचपीव्ही (HPV) प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील किशोरींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या कांचनताई राजेंद्र सांडभोर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, नवनाथ सांडभोर, लक्ष्मणनाना मुखेकर, विस्तार अधिकारी संभाजीराव कोकडे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक तुषारजी कुंभार यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच डॉ. दिक्षा मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर सर, डॉ. महाजन सर, आरोग्य निरीक्षक बलभीम पठारे, संदीप कुंजीर, आरोग्य सहायिका पुष्पा बर्डे, सुनिता जगदाळे, आरोग्य सेवक विनायक गोसावी, अमोल जाधव, आरोग्य सेविका विद्या लोखंडे, तेजवंती नैताम यांच्यासह संपूर्ण आरोग्य पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.यावेळी विद्याधाम प्रशाला कानूर मेसाई व न्यू इंग्लिश स्कूल, कवठे येथील १४ ते १५ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीचे डोस देण्यात आले. तज्ज्ञांनी या लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगताना, भविष्यात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पालकांना आवाहन केले की, आपल्या मुलींना वेळेवर लसीकरण करून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. ग्रामीण भागात अशा आरोग्य मोहिमांमुळे महिलांच्या आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.या उपक्रमामुळे कवठे येमाई परिसरात आरोग्याबाबत जागरूकते चे नवे पाऊल पडले असून, भविष्यात अशा मोहिमा अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कवठे येमाईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; किशोरींच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य
BySamajsheel NewsMarch 28, 20260
