समाजशील न्यूज नेटवर्क,मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरातील अनेक दुकाने,घरे फोडल्या च्या घटना तसेच पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पोलिस वसाहतीच्या छतावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुरबाड एसटी बसस्थानकात बसमध्ये चढताना चक्क एका पोलीस पत्नीच्या पर्समधील सुमारे एकोणीस तोळ्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबविल्याच्या घटनेने एकाच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुरबाड मधील सरळगाव उंबरपाडा येथील संजय हिरू घुडे हे मुरबाड राष्ट्रिय महामार्ग ट्राफिक मध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांची पत्नी सारिका ही आपले नातेवाईक आकाश संतोष घुडे याच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी उंबरपाडा येथे कल्याणहून मुरबाडला आल्या. मुरबाडहून सरळगाव उंबरपाडा येथे जाण्यासाठी त्या किसळ बसमध्ये चढल्या बसमध्ये चढतेवेळी खुप गर्दी होती. त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन बसमध्ये चढल्या. बसमध्ये बसल्यावर त्यांना लक्षात आले की आपल्या पर्सचे वजन कमी झाले आहे. कारण गर्दीत चैन स्नँचींगच्या घटना घडतात म्हणून त्यांनी दागिने अंगावर न घालता पर्समध्ये ठेवले होते. पर्समध्ये पाहिले तर दागिने नव्हते. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सारिका संजय घुडे यांचे सुमारे एकोणीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत त्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक पवार हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान मुरबाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनेनंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.