नव कॅलेंडर
झळकलं भिंतीवर
नवीन कोरं कॅलेंडर
जुन बिचारं लगेचं
रद्दीत झालं सरेंडर
विचार करी ते जुने
वर्षसंपले हे लवकर
कालचक्र हे चालते
इथेकाही ना स्थावर
सर्वांचे लक्ष मजकडे
मी चालू होतो तोवर
पहायचे कौतुकाने
ताजा तवाना जोवर
कुरवाळे सान थोर
पाहती सारे वारंवार
ठरवी कार्यक्रम ते
कधीकुठले सणवार
कुटूंबाचा वाटे भाग
अप्रूप ते अपरंपार
कळले सत्य उशीरा
हा केवळ व्यापार
पडे जाऊन रद्दीत
कचरा झालाय पार
कळलाकाळ महिमा
माणसा तुझे आभार
आले दिवस नव्याचे
लावा छान कॅलेंडर
महिमा हा काळाचा
स्वागत करू तोंडभर
२) सुसज्ज स्वागत
सुसज्ज अवघे विश्व
नववर्षाच्या स्वागता
सजवावे घर सुरेख
यावे वाटे अभ्यागता
जुने वर्षा सुखेनिरोप
करा सुयोग्य सांगता
भले बुरे भरपूर दिले
मिळाले रे न मागता
मिळे शिकायला भले
सिंहावलोकन करता
अनुभवी झालो सारे
हे साल सरता सरता
जी ट्वेंटी परिषदेतून
एकत्र आणले जगता
परतले नाही रे संकट
विषय असे धगधगता
अर्थव्यवस्था बलवान
यायला हवी स्थिरता
पाऊले टाकावे जपून
नको उगाचं अधिरता
संकल्प करायचे भले
करावी साध्य सांगता
स्वागतपाळून संहिता
सुहास्य रे ना झिंगता
नव वर्षा आनंद वाटो
इथे सुखानंदे राहता
जड व्हावी ती पाऊले
निरोप घेऊन निघता
3) दमानं
खाते वाटप करता
घ्यावे जरासे दमानं
खत पाणी शिस्तीत
पीक फुलेलं जोमानं
सोबतचे भले सगळे
चिंब भिजू दे घामानं
हवामान तपासूनच
जपून उडवा विमान
परेड भिने अंगामध्ये
चालू शिस्त नियमानं
खात्री असावी मित्रा
कुणाचा ना अवमान
गठबंधन महत्व पूर्ण
ठेवावा योग्य सन्मानं
बलाबल कुणा किती
तराजू तोलावे समान
कायम ठेवावे सत्तेत
भले चांगले विद्यमान
कार्यकुशल निष्ठावान
योग्य साधे विद्या मान
सत्वर तत्पर निर्णय
समस्या घाली थैमान
आता जनमत बाजूने
बदलून जाई हवामान
संधी तरूण रक्त स्तव
नसावे वृद्ध वयोमान
जनसेवा निष्ठे करता
सत्ता होई आयुष्यमान
4) अडीच वर्षे
मंत्री पदी अपेक्षा
गोतावळा जमला
वर्णी लागे त्यांची
डाव जया जमला
काय निकष आहे
साराकसा जुमला
गौड बंगाल भलते
संशयी हा मामला
सत्ते साठी समस्त
करतात मलातुला
अडीचअडीच वर्षे
उत्तमबुवा फाॅर्मुला
आशेचेगाजर दावा
झुलवत राहे झुला
चंचूप्रवेश करायला
मार्ग ठेवावा खुला
सजूनबसले सगळे
करावी सुवर्ण तुला
आपलेहाती तराजू
मर्जीनुसार रे तोला
मोकळीजरी खोली
बाहेरुन मोठा ताला
आत आहेत गाठोडे
खुशाल खोटे बोला
शांत होतील समंध
फसे जाळ्या भोला
कान मंत्र महत्त्वपूर्ण
रे कर भला तो भला
– हेमंत मुसरीफ पुणे .
वाचकांना विनंती आपणास कविता आवडल्यास लेखक – हेमंत मुसरीफ पुणे .9730306996. यांच्या व समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) -९४२३०८३३७६ या व्हाट्सअप क्रमांकावर अभिप्राय द्यावा