शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानगंगा विश्वविद्यालय व ज्ञानगंगा इनेटरनॅशल स्कुल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.सलग तीन दिवस चाललेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून विश्वराज धनंजय महाडिक, खासदार हेमंत गोडसे, तहसीलदार आकाश किसवे, किशोरराजे निंबाळकर (मा.अध्यक्ष लोकसेवा आयोग), माजी आमदार काकासाहेब पलांडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी, ऍड.धर्मेंद्र खांडरे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व संदेश केंजळे, डी वाय एस पी सागर कदम व प्रवीण ढोले, डेप्युटी कमिशनर मिनीनाथ दंडवते, उचीमुरा डायसुके सेन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तिसर्या दिवशी शिरुर शहरातील सर्व डॉक्टरांची असणारी उपस्थिती ही विशेष लक्षणीय बाब ठरली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेराम घावटे सर यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पारितोषिक देखील देण्यात आले. नर्सरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी विविध सणांवर आधारित तसेच पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लोककलांवर आधारित विविध कलाविष्कार सादर केले. तर ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थीदेखील नवरस थीम वर आधारित विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल गौरव खुताळ, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग सुनंदा लंघे, उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे, उपमुख्याध्यापिका शोभा अनाप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घावटे, त्याचप्रमाणे सीईओ नितीन घावटे, प्राचार्य संतोष येवले यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी पालक वर्ग व संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या संचालिका अमृतेश्वरी घावटे यांनी मानले.