पहाटे मंगल समयी येऊन समाज प्रबोधन करणारा,आशीर्वाद देऊन जाणारा – वासुदेव – हुरहूर एकच,गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 

151
             समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जुन्या काळात अर्थात सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी मला चांगले आठवते मी प्राथमिक,माध्यमिक शिक्षण घेत असताना साधारण १९७० ते १९८० दशकातील तो काळ असावा. मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी त्यावेळची पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्‍या महिला,गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडी माणसं अन् त्याच वेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला,अंगात विशिष्ट प्रकारचा झगा,खाली विजार किंवा धोतर,कमरेला बांधलेलं उपरणं, कपाळावर आणि गळ्यावर गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, काखेला झोळी, पायात घुंगरू, हातात चिपळ्या, टाळ आणि मुखात भगवंताचे नाम म्हणत नाच करणा-या वासुदेवाचे दर्शन किमान वर्षातून काही दिवस ठरलेले च असायचे
भल्या अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने साक्षात भगवान श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की त्या काळातील आमच्या सारखी लहान मुले खूप आनंदून जात. पहाटेच गावात हरीनाम गात फेरफटका मारणाऱ्या या वासुदेवास गावातील सुवासिनी बायका,माणसे सुपातून जोंधळे घालत आणि शक्य असेल तसे दान ही करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्या वासुदेवास नमस्कार करत. वासुदेव ही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.आता मात्र मनाला हुरहूर लागते ते दिवस आठवताना व वाटते गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds