समाजशील न्यूज नेटवर्क,मुरबाड,ठाणे – (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – देशभरात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेलें वक्तव्य, त्याचं प्रमाणे महाराष्ट्रातील परभणी व बीड येथिल घटनेच्या निषेधार्थ मुरबाड मध्ये महा विकास आघाडी ने मुरबाड नगरपंचायत समोर निषेध निदर्शन करत अमित शहा यांच्या राजीनाम्याची तसेच परभणी व बीड घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली या मागणीचे निवेदन महा विकास आघाडीच्या शिष्ट मंडळाने प्रशासनाला दिले.
यावेळी महा विकास आघाडीच्या प्रतिनिधींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत निषेध निदर्शनाला सुरुवात केली या निषेध निदर्शनासाठी माजी आमदार गोटीराम पवार यांचेसह सेनेचे उपजिल्हाध्यक्ष आप्पा घुडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, लियाकत शेख, शिवसेनेचे (उबाठा) संतोष जाधव, काँग्रेसचे चेतनसिंह पवार, राष्ट्रवादीचे (एसपी) दिपक वाघचौडे, रिपाइंचे लक्ष्मण खोळांबे, राजेश गायकवाड,माकपच्या कविता वारे यांचे सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भर संसदेत अपमान करणाऱ्या मनुविकृत गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, परभणी येथील भारतीय संविधांनाच्या प्रतिकृतीची विटंबना, करणाऱ्या नमो रुग्ण आरोपीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा, परभणी येथील आंबेडकरी वस्त्या मध्ये जनतेवर क्रूर आमानुष हल्ले, करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशीचा कस्टडीत खून करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, संतोष देशमुख हत्येतील मुख्य सुत्रधारणा अटक करा, पँथर नेते विजयजी वाकोडेंच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मनुवादी पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी मुरबाडच्या नि. ना. तहसिलदार सुषमा आव्हाड यांना देण्यात आले.