समाजशील न्युज नेटवर्क,शिक्रापूर,शिरुर (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरूर तालुक्यातील कोंढापुरी पासून शिरूरच्या दिशेने १ किलोमीटर अंतरावर असलेल्या कामिनी ओढ्यावरील पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील पुलाच्या कठड्याची अद्याप दुरूस्ती करण्यात आलेली नाही.काही अघटीत घटना घटण्याअगोदर या पुलाच्या कठड्याची संबंधित विभागाने तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.
कोंढापुरीपासून शिरूरच्या दिशेने १ किलोमीटर अंतरावर कामिनी ओढा असून पुणे – अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या या पुलाचे लोखंडी पाईपचे कठडे ब-याच दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. पुलाजवळचा महामार्ग वेड्या वाकड्या वळणाचा तसेच चढ उताराचा असून शिरूरच्या दिशेने प्रवास करणा-या वाहनचालकांना पुढे पुल असल्याचे पटकन लक्षात येत नाही. या पुलावर ब-याच वेळा अपघात झालेले आहेत. अपघात टाळण्यासाठी या पुलाच्या तुटलेल्या लोखंडी पाईपच्या कठड्याची त्वरीत दुरूस्ती करणे गरजेचे असल्याचे मत महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांतुन व्यक्त होत आहे.

कोंढापुरी येथील पुलावरील तुटलेल्या कठड्याची तात्काळ दुरुस्ती करा – प्रवाशांतून मागणी
BySamajsheelDecember 25, 20240
Previous Post १ जानेवारीच्या दरम्यान कोणीही मोबाईलवर वादगस्त विधान करु नये - पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड
Next Postमुरबाड मध्ये परभणी तसेच बीड घटनेचा महा विकास आघाडीकडून निषेध व निदर्शनं